आमच्याविषयी

शोध जोडीदाराचा,
अगदी आपल्या मनातला...
आमच्याविषयी - शुभनाती वधू - वर सूचक केंद्र
योग मराठा वधू वर सूचक केंद्र कोल्हापूर या महाराष्ट्रातील नामांकित विवाहसंस्थेचे संस्थापक , श्री गिरीश बाळासाहेब पाटील (BE,MBA) यांनी मे २०१३ मध्ये मराठा समाजातील वधुवरांसाठी या विवाह संस्थेची स्थापना कोल्हापूर येथे केली. मराठा समाजातील मुलामुलींची लग्ने जमविण्यास येणाऱ्या अडचणींचा विचार करून सदर विवाह संस्थेची स्थापना केली. शिक्षणामुळे नोकरी व्यवसायानिमित्त मूळ गावाकडील भाऊबंद / नातलग यांच्याशी असलेला संपर्क कमी झाल्याने, मुला-मुलींचे शिक्षण वाढल्याने मुलामुलीच्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा देखील उंचावल्या. मराठा समाजात लग्न जमविताना काही अनिष्ट प्रथा चालीरीती रूढ होऊ लागल्या. त्या संदर्भात अशा पालकांना त्यांच्या चुका निदर्शनास आणून देऊन समाज प्रबोधनाचे मोठे काम आमच्या संस्थेने केले. उदा. जन्मकुंडलीचा आग्रह धरणे, मुलामुलीची नाडी एक असणे, नुसत्या कुळावरून मामा भाची नाते मानणे.